बंड्या बायकोचे फोटो काढत असतो. बंड्याची बायको - काय हो , आज तुम्हाला झालंय तरी काय ?किती फोटो काढत सुटलायत माझे ? बंड्या - काही नाही गं , आज ना मला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करायची खूप इच्छा झाली आहे.
सर - झंप्या , पाण्याचा फॉर्म्युला सांग. झंप्या - एचटूओ अधिक एमजीसीएल२ अधिक सीएएसओ४ अधिक एएलसीएल३ अधिक एनंओएच सर - अरे , काय बडबडतोयस तू ? हे उत्तर चुकीचं आहे. झंप्या - सर , आमच्या घरच्या नळाला येणा-या पाण्याचा हा फॉर्म्युला आहे.
न्यूटनच्या बायकोचा उखाणा... " आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं....... आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.... डोक्यावर पडलं सफरचंद , तर खायचं सोडून , येडं शोध लावत बसलं.
No comments:
Post a Comment