Wednesday, May 21, 2014

परत कशाला विचारताय?

नोकरीसाठी मुलाखत सुरू असते.

मुलाखत घेणारा - बोला, आपलं नाव काय?

मुलाखत देणारा - विजय दीनानाथ चौहान

घेणारा - अरे; पण या फॉर्मवर तर आशीष पाटील असं लिहिलंय.

देणारा - लिहिलंय ना? दिसतंय ना? मग परत कशाला विचारताय?

वेड्या माणसाचं प्रेम

बायको - तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे?

नवरा - खूप.

बायको - मग मी मेले तर काय होईल?

नवरा - मी ठार वेडा होईन.

बायको - पण तुम्ही दुसरं लग्न करणार की नाही?

नवरा - अगं, वेड्या माणसाचं काही सांगता येतं का?

Thursday, March 27, 2014

इंटरव्ह्यू घेऊन झाल्यानंतर

मॅनेजर - (इंटरव्ह्यू घेऊन झाल्यानंतर) काँग्रॅट्स...तू आमच्या कंपनीत जॉइन करतोयस. गंपू - थँक यू सर. मॅनेजर - तुला या महिन्यापासून ५० हजार रुपये पगार मिळेल. तीन महिन्यांनंतर तुझा पगार ७५ हजार होईल. गंपू - ओके, मग मी तीन महिन्यांनी जॉइन होतो सर.

Monday, March 24, 2014

पॉपकॉर्न उड्या का मारतात?

झंप्या - अरे गण्या, पॉपकॉर्न तयार होताना त्याचे दाणे उड्या का मारत असतात?
गण्या -त्या दाण्यांसारखं उघड्या अंगाने तापलेल्या भांड्यात बसून बघ, म्हणजे आपोआप समजेल.

पटकन

सर - बंड्या, आता मी काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं पटकन उत्तर द्यायचं. काय?
बंड्या - हो, सर.
सर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
बंड्या - पटकन.

Tuesday, February 25, 2014

हुंड्यासाठी खूप त्रास

चिंगी (पोलिसांना) : माझी सासरची मंडळी मला हुंड्यासाठी खूप त्रास देतात.

पोलिस : हो का? नक्की काय करतात?

चिंगी : खुर्चीवर बांधून धूम ३ दाखवतात!

Sunday, February 23, 2014

अंडे का फंडा

एका कोंबडीने भारत-चिन बाँर्डर वर एक अंड दिल
.
.
दोन्ही देश त्या एका अंड्यासाठी भांडू लागले
शेवटी एक फैसला झाला की
.
जो देश दुसर्या देशाच्या मुलिंना जास्तित जास्त किस करेल, ते अंड
त्या देशाचा
.
.
भारताकडून Emran Hashmi चिनमध्ये गेला आणि 20,000xxx(नेमका नंबर उपलब्ध नाही) मुलीना कीस करुन आला
.
.
चिनवाले excited होऊन :-
आता आमची बारी
.
.
भारत:- चल यार ते अंड तुच ठेव ..

Wednesday, February 19, 2014

फरक

सर : मुलांनो, ऑरेंज आणि अॅपलमध्ये काय फरक असतो?

बंता : सर, ऑरेंजचा रंग ऑरेंजच असतो; पण अॅपलचा रंग अॅपल नसतो!

Tuesday, February 11, 2014

दोन बायका

एक माणूस पाय फ्रॅक्चर झाला म्हणून दवाखान्यात जातो.

तिथं दुसरा माणूस बसलेला असतो. त्याचे दोन्ही पाय मोडलेले असतात.

पहिला त्याला कुतुहलानं विचारतो, 'तुम्हाला दोन बायका आहेत का?'

तुझं लग्न झालंय?

गंपूला अननोन नंबरवरून मुलीचा फोन आला.

कॉल करणारी मुलगी: तुझं लग्न झालंय?

गंपू: नाही!

कॉल करणारी मुलगी: तुझी बायको बोलतेय.. ये घरी बघते तुला!

पुन्हा अननोन नंबरवरून कॉल येतो.

कॉल करणारी: तुझं लग्न झालंय?

गंपू: हो!

कॉल करणारी: काय? तुझी गर्लफ्रेंड बोलतेय.... फसवलंय मला? भेट मग बघते..

गंपू: अगं, नाही नाही.. मला वाटलं माझी बायको बोलतेय...

कॉल करणारी: बायकोच बोलतेय.. ये घरी, मग बघ

Thursday, January 9, 2014

त्सुनामी


सर - बंड्या...सांग बरं, त्सुनामी लाटेला मराठीत काय म्हणतात?

बंड्या - सोप्पंय, आली लहर केला कहर.

Wednesday, January 8, 2014

फिर भी तुम कितनी सुंदर हो


बंता (बायकोला) : ना कजरे की धार , ना मोतीयों के हार , ना कोई किया सिंगार , फिर भी तुम कितनी सुंदर हो...

बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून..

दोन


संता फोन करण्यासाठी एसटीडी बूथवर गेला आणि तिथे उभारलेल्या दुकानदाराच्या दोन श्रीमुखात दिल्या.
दुकानदार (गाल चोळत) : का मारलं ?
संता : समोर बोर्डावर लिहिलंय की , दोन लावून डायल करा!

Wednesday, January 1, 2014

चांगल्या-चांगल्यांना हातात कटोरा धरायला लावेन


अभ्यासात मंद गती असलेल्या गंप्याला त्याचे वडील नेहमी बोलत असतात. एक दिवस चवताळून तो वडिलांना म्हणाला.

गंप्या - बाबा, मोठं झाल्यानंतर मी असा बिझनेस करेन, की चांगल्या-चांगल्यांना हातात कटोरा धरायला लावेन.

वडील - ते कसं काय रे गंप्या?

गंप्या - पाणी-पुरीची गाडी टाकून...!