गर्लफ्रेंडच्या मिनतवाऱ्या करूनही यश येत नसलेल्याने निराश झालेल्या गंपूने अखेर देवाचा धावा करायचे ठरवले. गंपू : देवा, आता तूच सांग मी काय करू?.... गुलाबाचं फूल, जे एका दिवसात कोमेजतं, त्याच्यावर तिचं एवढं प्रेम आहे... पण मी तिच्यासाठी रोज कणाकणाने मरतोय, त्याची तिला अजिबातच किंमत नाही... देव : अरे, मस्त लाइन आहे... फेसबुकवर टाक!
Thursday, June 27, 2013
गर्लफ्रेंडच्या मिनतवाऱ्या करूनही यश येत नसलेल्याने निराश झालेल्या गंपूने अखेर देवाचा धावा करायचे ठरवले. गंपू : देवा, आता तूच सांग मी काय करू?.... गुलाबाचं फूल, जे एका दिवसात कोमेजतं, त्याच्यावर तिचं एवढं प्रेम आहे... पण मी तिच्यासाठी रोज कणाकणाने मरतोय, त्याची तिला अजिबातच किंमत नाही... देव : अरे, मस्त लाइन आहे... फेसबुकवर टाक!
Tuesday, June 25, 2013
संशयी बायको
इन्व्हेस्टमेंट डबल
भारी साडी खराब होऊ नये म्हणून
गंपूचा किस्सा
उधार बाइक
Monday, June 24, 2013
गंपू एका पार्टीला गेला होता. तिथे एक सुंदर तरुणी एकटीच बसली होती. गंपू त्या मुलीकडे गेला. गंपू - हॅल्लो , तू डान्स करणार का ? ती तरुणी उभी राहिली आणि म्हणाली , ' ओह येस...जरुर. ' गंपू - मग ही खुर्ची मी घेऊ ?
Sunday, June 23, 2013
संता विमानातून प्रवास करत होता. संता - ( हवाईसुंदरीला) ओय , तू तर एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस. हवाईसुंदरी त्याला जोरदार थप्पड लगावते. संता - कमाल झाली...तुमच्या आणि तिच्या सवयी पण सारख्याच आहेत.
Wednesday, June 19, 2013
Tuesday, June 18, 2013
गंपूच्या बायकोने त्याला एसएमएस केला. ' घरी कधी येणार ते मेसेज करून सांगा ' गंपूने तिला रिप्लाय दिला , ' नाही सांगू शकणार , एसएमएस फ्री नाहीयत गं '
Sunday, June 16, 2013
बंड्या बायकोचे फोटो काढत असतो. बंड्याची बायको - काय हो , आज तुम्हाला झालंय तरी काय ?किती फोटो काढत सुटलायत माझे ? बंड्या - काही नाही गं , आज ना मला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करायची खूप इच्छा झाली आहे.
सर - झंप्या , पाण्याचा फॉर्म्युला सांग. झंप्या - एचटूओ अधिक एमजीसीएल२ अधिक सीएएसओ४ अधिक एएलसीएल३ अधिक एनंओएच सर - अरे , काय बडबडतोयस तू ? हे उत्तर चुकीचं आहे. झंप्या - सर , आमच्या घरच्या नळाला येणा-या पाण्याचा हा फॉर्म्युला आहे.
न्यूटनच्या बायकोचा उखाणा... " आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं....... आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.... डोक्यावर पडलं सफरचंद , तर खायचं सोडून , येडं शोध लावत बसलं.
Friday, June 14, 2013
ठमाकाकू : अरे , तुम्हाला किती वेळा सांगितलं मी इकडे खेळू नका म्हणून... बंड्या - आम्ही मोजलं नाही काकू... !
खूप दिवसांपासून ऑनलाइन नाही आहात ? मग ऐका हा उखाणा...खास तुमच्यासाठी गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा मेसेज नाही , ऑनलाइन नाही ठरलाय का साखरपुडा ?
नवरा - तू माझा फोटो नेहमी पर्समध्ये का ठेवतेस ? बायको - कारण जेव्हा-जेव्हा माझ्यासमोर एखादा मोठा प्रॉब्लेम येतो , तेव्हा मी फक्त तुझ्या फोटोकडे एकदा बघते आणि तो प्रॉब्लेम सोडवायची शक्ती मला मिळते. नवरा - ( खूश होऊन) बघितलंस , किती पॉवरफूल आहे मी ? बायको - हो ना , मी तुझ्या फोटोकडे पाहते आणि स्वतःलाच म्हणते , ' यापेक्षा मोठा प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यात असूच शकत नाही. '
गंपू: अरे, डासांनी वैताग आणलाय रे नुसता... तुझ्याकडे काही सोपा उपाय आहे का? झंपू: एक काम कर..साखर आणि लाल तिखट यांचं मिश्रण करून डासाला दे. हे मिश्रण खाल्ल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल. तो पाण्याच्या टाकीजवळ गेला की, त्याला मागून धक्का दे. भिजल्यामुळे तो कोरडा व्हायला आगीजवळ गेला, की त्यात रॉकेल ओत. त्यामुळे तो जखमी होईल, मग हॉस्पिटलात जाईल. तिथे जाऊन त्याचा ऑक्सिजन मास्क काढ, मग बघ डास मरतो की नाही!
पुण्यात डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला एक फोन आला, ' अहो, जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना, ' चितळे ' उघडले आहेत का?
चला एक कोडं.. लग्नाआधीच्या जोड्यांना जर लव्हबर्ड्स म्हणत असतील. तर लग्नानंतरच्या जोड्यांना काय म्हणावं ?.. .. अँग्री बर्ड्स
सर : बंडू , तुला आज उशीर का झाला ? बंडू : सर , मी स्वप्नात विमानाने अमेरिकेला गेलो होतो , त्यामुळे मला उशीर झाला . सर : आणि खंडू तुला का झाला उशीर ? खंडू : सर , मी बंडूला आणायला विमानतळावर गेलो होतो .
बँकेत दरोडा पडतो. दरोडेखोर तिजोरीतील रोकड लुटून पळ काढत असतात. तेवढ्यात अकाउंटंट म्हणतो , ' प्लीज ते हिशोबाचं रजिस्टर पण घेऊन जा... त्यात मी दोन लाखांचा घोटाळा केलाय... '
पाकिस्तानी मीडियाने ब्रेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे ब-याच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क , देवमासे देखील आहेत.... दुस-या दिवशी नासाने जाहीर केलं की पाकिस्तानने अंतराळात पाठवलेलं यान अरबी समुद्रात सापडलं आहे...
एकदा कॉलेजमध्ये राणीने झंप्याला चप्पल फेकून मारली. झंप्या : काय गं , तू मला ही चप्पल रागातच फेकून मारलीस ना ? राणी : हो , रागातच मारली. झंप्या : मग ठीक आहे. नाहीतर आपण असली चेष्टा खपवून घेतली नसती!
चिंगी (फोनवर) : बंड्या , कुठे आहेस रे ? कालपासून फोन करत होते. आजारी आहेस का ? बंड्या : अगं , काही नाही. बाबांनी खूप बडवलं काल. चिंगी : का म्हणे ? बंड्या : अगं , पत्रपेटीत तुझं प्रेमपत्र सापडलं. पण , तू पत्र का लिहिलंस ? ई-मेल करायचा ना ? चिंगी : मग तुला मार कसा बसला असता ?
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ; पण आता त्याने नामी युक्ती शोधून काढली आहे. तो दरवाज्याजवळ जाऊन जोरात ओरडतो , ' दया दरवाजा तोड दो. ' त्यानंतर आपोआप भीतीने दरवाजा उघडतो.
न्यायाधीश : गण्या , तू पाकीट मारलंस , त्यामुळे तुला ३०० रुपये दंड द्यावा लागेल. गण्या : पण साहेब , माझ्याकडे फक्त १०० रुपयेच आहेत. न्यायाधीश : नाही. तुला ३०० रुपये द्यावेच लागतील. नाहीतर तुला तुरुंगात जावं लागेल. गण्या : ठीक आहे साहेब. मला १० मिनिटं फिरायची परवानगी द्या. इथल्या इथे दंड भरून टाकतो!
तुकाराम : काय रे सख्या , लेका केकवर बल्ब का लावलास ? सखाराम : अरे , ६० मेणबत्या कुठे लावत बसू , ६० वॉटचा बल्ब लावून टाकला!
बायकोः काय हो .. काय करताय ? नवराः माश्या मारतोय . बायकोः किती मारल्या ? नवराः पाच .... २ फिमेल , ३ मेल . बायकोः ते कसं काय ? नवराः २ आरश्यासमोर होत्या आणि ३ दारुच्या बाटलीवर बसल्या होत्या .
नवरा - नारीचा अर्थ आहे शक्ती . बायको - मग पुरुषाचा अर्थ काय सांगा . नवरा - सहनशक्ती .
चिंगी - मन्या , प्रार्थना कर की मी नापास होईन . मन्या - का गं ? चिंगी - बाबांनी सांगितलंय की , पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन . आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन .
मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस मुलगी : वा काय होत स्वप्न मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत मुलगी : हा पुढे मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो ... मुलगी : बापरे मग काय होत मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो आणि तू उठून काय तरी शोधत असतेस मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ? मुलगा : नाही ग : : : : मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस ....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी
Subscribe to:
Posts (Atom)