ठमाकाकू : अरे , तुम्हाला किती वेळा सांगितलं मी इकडे खेळू नका म्हणून... बंड्या - आम्ही मोजलं नाही काकू... !
खूप दिवसांपासून ऑनलाइन नाही आहात ? मग ऐका हा उखाणा...खास तुमच्यासाठी गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा मेसेज नाही , ऑनलाइन नाही ठरलाय का साखरपुडा ?
नवरा - तू माझा फोटो नेहमी पर्समध्ये का ठेवतेस ? बायको - कारण जेव्हा-जेव्हा माझ्यासमोर एखादा मोठा प्रॉब्लेम येतो , तेव्हा मी फक्त तुझ्या फोटोकडे एकदा बघते आणि तो प्रॉब्लेम सोडवायची शक्ती मला मिळते. नवरा - ( खूश होऊन) बघितलंस , किती पॉवरफूल आहे मी ? बायको - हो ना , मी तुझ्या फोटोकडे पाहते आणि स्वतःलाच म्हणते , ' यापेक्षा मोठा प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यात असूच शकत नाही. '
गंपू: अरे, डासांनी वैताग आणलाय रे नुसता... तुझ्याकडे काही सोपा उपाय आहे का? झंपू: एक काम कर..साखर आणि लाल तिखट यांचं मिश्रण करून डासाला दे. हे मिश्रण खाल्ल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल. तो पाण्याच्या टाकीजवळ गेला की, त्याला मागून धक्का दे. भिजल्यामुळे तो कोरडा व्हायला आगीजवळ गेला, की त्यात रॉकेल ओत. त्यामुळे तो जखमी होईल, मग हॉस्पिटलात जाईल. तिथे जाऊन त्याचा ऑक्सिजन मास्क काढ, मग बघ डास मरतो की नाही!
पुण्यात डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला एक फोन आला, ' अहो, जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना, ' चितळे ' उघडले आहेत का?
चला एक कोडं.. लग्नाआधीच्या जोड्यांना जर लव्हबर्ड्स म्हणत असतील. तर लग्नानंतरच्या जोड्यांना काय म्हणावं ?.. .. अँग्री बर्ड्स
सर : बंडू , तुला आज उशीर का झाला ? बंडू : सर , मी स्वप्नात विमानाने अमेरिकेला गेलो होतो , त्यामुळे मला उशीर झाला . सर : आणि खंडू तुला का झाला उशीर ? खंडू : सर , मी बंडूला आणायला विमानतळावर गेलो होतो .
No comments:
Post a Comment