एका गावावर दरोडा पडतो.
डाकू : तुझं नाव काय?
गावातील महिला : बाबा रे, माझं नाव गंगूबाई.
डाकू : मी तुला सोडून देतो. कारण माझ्या आईचं नाव गंगूबाई होतं.
डाकू : (पुरुषाकडे वळून) म्हाताऱ्या, तुझं नाव काय ?
पुरुष : (अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत) माझं नाव ज्ञानबा. पण.. पण.. सगळे मला लाडाने गंगूबाईच म्हणतात हो.
एक शास्त्रज्ञ आणि त्याचा एक सामान्य बुद्धीचा मित्र गप्पा मारत असतात. बोलता-बोलता ते भांडू लागतात.
शास्त्रज्ञ : माझी तुला किंमत नाही ; पण माझा मेंदू विकायचा ठरविला तर काही कोटी रुपये मिळतील.
मित्र : माझ्या मेंदूची किंमत तुझ्या दुप्पट-तिप्पट आहे.
शास्त्रज्ञ : कशावरून ?
मित्र : कारण , त्याचा वापरच झालेला नाही ना!
मुलगा - ( पोलिस इन्स्पेक्टरना) साहेब , माझ्या मित्राला शोधा हो. गेल्या तीन-चार दिवसांपासून तो हरवलाय.
इन्स्पेक्टर - तू शेवटचं कधी पाहिलं होतंस त्याला ?
मुलगा - व्हॉटस अपवर...३ दिवसांपूर्वी लास्ट सीन दिसलं होतं. त्यानंतर पत्ताच नाही त्याचा.
एकदा एक पुढारी विन्याच्या गावात आले होते गावात त्यांची जंगी सभा झाली , गावकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपल्या मागण्या ठेवल्या.
विन्या : (पुढाऱ्याला) साहेब , आम्हाला आमच्या गावात एक पूल पाहिजे.
मुख्यमंत्री : (हैराण होऊन) पण तुमच्या गावात नदी कुठे आहे ?
विन्या : ठीक आहे. मग एक नदी पण द्या!