Thursday, June 27, 2013


एक माणूस धरणातील वाहते पाणी पाहून म्हणतो, 'अरेरे, हजारो लीटर पाणी वाया जात आहे.' गंपू : तुम्ही इंजिनीअर आहात काय? माणूस : नाही. माझा डेअरीचा धंदा आहे!


गर्लफ्रेंडच्या मिनतवाऱ्या करूनही यश येत नसलेल्याने निराश झालेल्या गंपूने अखेर देवाचा धावा करायचे ठरवले. गंपू : देवा, आता तूच सांग मी काय करू?.... गुलाबाचं फूल, जे एका दिवसात कोमेजतं, त्याच्यावर तिचं एवढं प्रेम आहे... पण मी तिच्यासाठी रोज कणाकणाने मरतोय, त्याची तिला अजिबातच किंमत नाही... देव : अरे, मस्त लाइन आहे... फेसबुकवर टाक!

Tuesday, June 25, 2013

संशयी बायको


गंपू घरी उशीरा आला. उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं ' अगं , मित्राकडे गेलो होतो गं! '. बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला. त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं , ' हो वहिनी , आलेला ना इथे तो ' तिघांनी सांगितलं , ' आला होता...हा काय , आत्ताच गेला. ' तर उरलेले दोघे म्हणाले , ' अहो वहिनी , हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन ?'

इन्व्हेस्टमेंट डबल


शेअर बाजार कोसळल्याने मगनभाय कपाळाला हात लावून बसले होते. ते बघून मगनभाईंची जाडजूड बायको त्यांच्याकडे आली. बायको - काय हो , काय झालं ? मगनभाय - ( तिच्याकडे बघत) काय सांगू तुला ? तू माझी एकमेव इन्व्हेस्टमेंट आहेस जी गेल्या दोन वर्षांत डबल झालीय.

भारी साडी खराब होऊ नये म्हणून


एक मोलकरीण मालकिणीचा रेनकोट घालून रस्त्याने जात असते . तेवढ्यात समोरून मालकीण येते आणि विचारते , ' काय गं , तू माझा रेनकोट का घातलास ?' मोलकरीण : तुमची भारी साडी खराब होऊ नये म्हणून !

गंपूचा किस्सा


गंपू : का रडतेस ? पिंकी : कमी मार्क मिळाले ... गंपू : किती मिळाले ? पिंकी : ८८ गंपू : मग रडतेस कशाला ? एवढ्या मार्कात मी आणि झंपू दोघेही पास झालो असतो !!!

उधार बाइक


बॉयफ्रेंड - हाय डिअर , आज मी तुला जे मागशील ते देईन . काय पाहिजे बोल , सोन्याची चेन , फाइव्हस्टार हॉटेलमध्ये पार्टी , की दुकानात जाऊन चार - पाच ड्रेस घेऊन देऊ ? गर्लफ्रेंड - वॉव ... किती वाजता येशील संध्याकाळी ? बॉयफ्रेंड - लवकरच येतो , मित्राने आजच्या दिवस बाइक दिलीय ना उधार .

मोबाइल फोनचा शोध कुणी लावला यावरुन वादावादी सुरू होती . अमेरिकन - मोबाइल फोन हा आम्ही लावलेला शोध आहे . चिनी - मोबाइल तुमचा असला तरी सिमकार्डचा शोध आमचा आहे . जपानी - सिमकार्ड झालं , पण नंतर एसएमएसचा शोध आम्ही लावून दिला आहे . कोरियाई - ब्लूटूथचा शोध लावणारे आम्हीच आहोत . ... ... संता - ओय , मिस्ड कॉलचा शोध तर आम्हीच लावला आहे .