Wednesday, October 16, 2013

सुंदर मुली


प्रियकर : सुंदर मुली कधीच कोणत्या मुलाच्या मागे धावत नाहीत. प्रेयसी : कशावरून ? प्रियकर : पिंजरा कधी उंदराच्या मागे धावलेला पाहिला आहेस का तू ?

रिलॅक्सिंग


अमेरिकेत एका बीचवर गोपालसिंग पहुडलेला असतो. तिथे एक अमेरिकन येऊन त्याल विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?' गोपालः नाही ... आय अॅम गोपाल सिंग ... थोड्या वेळाने दुसरा अमेरिकन येऊन तेच विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?' शेवटी गोपाल वैतागतो आणि उठून निघून जातो. तेवढ्यात त्याला एक अमेरिकन जवळच पहुडलेला दिसतो. गोपालः आर यु रिलॅक्सिंग ? अमेरिकनः येस ... गोपालः मग जा , सगळे तुलाच शोधताहेत!

व्हॉट्सअॅप स्टेटस मेसेज


सध्या लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅप या कम्युनिकेशन अॅपवरील काही मजेशीर स्टेटस मेसेज.. ड्रायव्हिंग - हा गेल्या आठवड्यापासून ड्रायव्हिंग करतोय.. बहुतेक दुबईला पोहोचला असेल ... स्लीपिंग - हा गेल्या तीन दिवसांपासून झोपलाय ... जिवंत आहे ना ? हॅपी न्यू इयर - ऑक्टोबर उजाडला , तरी त्याचे स्टेटस हे आहे ... बहुतेक न्यू इयर पार्टीच्या मूडमधून बाहेर आलेला नाही ... हॅपी - गेल्या महिन्याभरापासून हा मेसेज आहे.. हा भाई बहुतेक स्वर्गातच राहत असावा.. कांट टॉक , व्हॉट्स अॅप ओन्ली - अरे फोन आणि एसएमएससारख्या बेसिक गोष्टींसाठी मोबाइल वापरत नाहीस , तर फेकून दे ना!

इंग्लिश तपास


झोंबाडे मास्तरांना एकदा झंप्याचे इंग्लिश तपासायची लहर आली. झोंबाडे मास्तर : झंप्या , ' अंथरुण पाहून हातपाय पसरावे ' याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू. झंप्याने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले , ' स्प्रेड युवर ' तंगडी ' इन अव्हेलेबल ' घोंगडी '.

Tuesday, August 6, 2013

गंगूबाई


एका गावावर दरोडा पडतो. डाकू : तुझं नाव काय? गावातील महिला : बाबा रे, माझं नाव गंगूबाई. डाकू : मी तुला सोडून देतो. कारण माझ्या आईचं नाव गंगूबाई होतं. डाकू : (पुरुषाकडे वळून) म्हाताऱ्या, तुझं नाव काय ? पुरुष : (अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत) माझं नाव ज्ञानबा. पण.. पण.. सगळे मला लाडाने गंगूबाईच म्हणतात हो.

Sunday, August 4, 2013

गोल


एका फुटबॉल लढतीत.. संता : हे लोक चेंडूला लाथ का मारत आहेत ? मुलगा : गोल करण्यासाठी संता : पण चेंडू तर आधीच गोल आहे

Thursday, August 1, 2013

मेंदूची किंमत


एक शास्त्रज्ञ आणि त्याचा एक सामान्य बुद्धीचा मित्र गप्पा मारत असतात. बोलता-बोलता ते भांडू लागतात. शास्त्रज्ञ : माझी तुला किंमत नाही ; पण माझा मेंदू विकायचा ठरविला तर काही कोटी रुपये मिळतील. मित्र : माझ्या मेंदूची किंमत तुझ्या दुप्पट-तिप्पट आहे. शास्त्रज्ञ : कशावरून ? मित्र : कारण , त्याचा वापरच झालेला नाही ना!