Thursday, January 9, 2014

त्सुनामी


सर - बंड्या...सांग बरं, त्सुनामी लाटेला मराठीत काय म्हणतात?

बंड्या - सोप्पंय, आली लहर केला कहर.

Wednesday, January 8, 2014

फिर भी तुम कितनी सुंदर हो


बंता (बायकोला) : ना कजरे की धार , ना मोतीयों के हार , ना कोई किया सिंगार , फिर भी तुम कितनी सुंदर हो...

बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून..

दोन


संता फोन करण्यासाठी एसटीडी बूथवर गेला आणि तिथे उभारलेल्या दुकानदाराच्या दोन श्रीमुखात दिल्या.
दुकानदार (गाल चोळत) : का मारलं ?
संता : समोर बोर्डावर लिहिलंय की , दोन लावून डायल करा!

Wednesday, January 1, 2014

चांगल्या-चांगल्यांना हातात कटोरा धरायला लावेन


अभ्यासात मंद गती असलेल्या गंप्याला त्याचे वडील नेहमी बोलत असतात. एक दिवस चवताळून तो वडिलांना म्हणाला.

गंप्या - बाबा, मोठं झाल्यानंतर मी असा बिझनेस करेन, की चांगल्या-चांगल्यांना हातात कटोरा धरायला लावेन.

वडील - ते कसं काय रे गंप्या?

गंप्या - पाणी-पुरीची गाडी टाकून...!

Thursday, December 26, 2013

फक्त हो किंवा नाही


दोन मित्र बोलत असतात.

अमित : विलास, माझ्या प्रश्नाचं तू फक्त हो किंवा नाही असंच उत्तर द्यायचं बरं का.

विलास : हो. ठीक आहे विचार.

अमित : तुझ्या बायकोने तुला मारणं बंद केलंय का?

बाळ जन्माला आलं


नर्स : अभिनंदन.. तुमच्या घरी नवं बाळ जन्माला आलं आहे.

गंपू : मस्करी करताय? माझी बायको हॉस्पिटलात अॅडमिट आहे आणि बाळ घरी जन्माला आलंय होय!

'प्यारी माँ' अन 'जालिम बाप'


मध्यरात्री उशिराने आलेल्या मुलास आई विचारते

आई : काय रे, कुठं गेला होतास ?

मुलगा : आई, असं का म्हणतेस, मी इमोशनल चित्रपट पाहिला 'प्यारी माँ'

आई : अस्सं? ठीक आहे. आत ये, तुझे पप्पा वाट पाहत आहेत. ते तुला 'जालिम बाप' चित्रपट दाखवतील.