Wednesday, December 25, 2013

बढाया


गंपूः माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांनी बाण मारला तर ते आधी पोहोचतात आणि बाण नंतर पोहोचतो..

झंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांनी बंदुकीतून गोळी मारली तर ते आधी पोहोचतात आणि गोळी नंतर पोहोचते...

पंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांचं ऑफिस पाच वाजता सुटतं आणि ते चार वाजताच घरी पोहोचतात!

तुझ्यासाठी काही पण


(इंजिनिअरिंगचा मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो.)

मुलगा: आय लव्ह यु.. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू फक्त बोल.. तुझ्यासाठी काही पण...

मुलगी: बरं मग तू मला सगळे विषय केटीशिवाय सोडवून दाखव.

मुलगा: येतो ताई... काळजी घे!

खरं की नाही ते सांगा...


बायको: काय हो, आज तुम्ही दुसऱ्या कोणत्यातरी मुलीसोबत सिनेमाला गेला होता. खरं की नाही ते सांगा...

चतुर नवरा: काय करणार मी तरी... अगं आजकाल कुटुंबासोबत पाहावा, असा सिनेमा निघतो का तरी?

'माझा कुत्रा'


सर - झंप्या, 'माझा कुत्रा' या विषयावर तू लिहिलेला निबंध आणि तुझ्या भावाने गेल्या वर्षी लिहिलेला निबंध जसाच्या तसा आहे. तू कॉपी केलीस का?

झंप्या - नाही सर, कुत्रा तोच होता ना म्हणून.

सायक्लोन म्हणजे काय?


मुलाखतकार : ' सांगा बरं सायक्लोन म्हणजे काय? '

गणू : सायकल विकत घेण्यासाठी बँक जे लोन देते, त्याला सायक्लोन म्हणतात!

सुंदर मुलगी शोधतोय


मुलगा : मी स्वतःसाठी जगातली सर्वांत सुंदर मुलगी शोधतोय.

मुलगी : हे घे...मी आलेच.

मुलगा : व्हेरी गुड. आता तिला शोधायला तू मला मदत कर.

इंग्लिश हवं की गावठी?


गंपू - वेटर...एक प्लेट चिकन आण.

वेटर - सर, इंग्लिश हवं की गावठी?

गंपू - अरे...आण ना कुठलंही, मला कुठे त्याच्याशी गप्पा मारायच्यात?